तरूणीने दाखवले ‘धाडस’ ; मोबाइल चोरटा पोलिसांच्या ‘ताब्यात’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – धूम स्टाइलने दुचाकीवरुन मोबाइल चोरणारा अल्पवयीन चोरटा एका २५ वर्षाच्या तरुणीच्या धाडसामुळे आणि पाऊस पडल्याने दुचाकी घसरल्याने त्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. चोरट्याच्या दुचाकीचा मागचा हॅन्डल पकडल्याने ती तरुणी दहा फूट फरफट गेल्याने जखमी झाली आहे.

कशेळी येथील आणि मूळची अकोला येथील रहिवासी असलेली २५ वर्षाची तरुणी विवियाना मॉलमध्ये कामाला आहे. मंगळवारी रात्री कामावरून सुटल्यानंतर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील सर्व्हिस रोडने माजिवाडा नाक्याकडे पायी चालत निघाली होती. मागून डाव्या बाजूने आलेल्या एक दुचाकीस्वाराने तिच्या हातातून मोबाईल खेचला. आणि चोरटा पळून जाऊ लागला.

तात्काळ तरुणीने हिम्मतीने दुचाकीचे मागील हॅन्डल पकडत दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटा पुढे पळत असल्याने तरुणी चोर, चोर म्हणून जोरात ओरडली. ती तरुणी पुढे दहा फूट फरफटत गेल्यानंतर चोरट्याची दुचाकी घसरली. आणि त्याठिकाणी उभ्या असलेल्या काही लोकांनी चोरट्याला पकडले. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेत चोरट्याला दुचाकीसह ताब्यात घेतले असून याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे तरुणीच्या उजव्या गुडघ्यास दुखापत झाली आहे. तर, चोरटा अल्पवयीन असून कोकणीपाड्यात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्य विषयक वृत्त –

डँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा

भात खाल्ल्याने वजन वाढते; खरं आहे का ?

घातक ! दूधासोबत चुकनूही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ

गूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर