भिकार्‍याच्या बॅगमध्ये सापडले ‘एवढे’ लाख, पोलिस देखील ‘चक्रावले’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याला आपण नेहमी पैसे देत असतो, त्यामुळे तो पोटाला पुरेल इतके कमावतो असा आपला समज असतो, त्यामुळे भीक मागून मिळवलेल्या पैश्यातून त्याचे पोट भरत नसेल तर तो पैसे कुठे साठवून ठेवणार? असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र आंध्र प्रदेशमध्ये एका भिकाऱ्याकडे इतके पैसे सापडले की पोलीस देखील चकित झाले. आंध्रप्रदेशातील अनंतपूर मध्ये एका भिकाऱ्याच्या पिशवीत जवळपास साडेतीन लाख रुपये सापडले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना फोन आला की, एका भिकाऱ्याचा झोपेत मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांनी त्याचे सामान तपासून पहिले. यावेळी पोलिसांना धक्का बसला. पोलिसांना त्या भिकाऱ्याची पैशाची बॅग सापडली असता त्यांना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे सापडले. तो ज्या ठिकाणी झोपत होता, त्याच ठिकाणी खाली पैसे ठेवत होता. त्यावेळी पोलिसांनी ही रक्कम मोजली असता त्यांना त्या पिशवीत ३ लाख २२ हजार रुपये आढळून आले. त्यामध्ये नोटांसोबतच चिल्लर देखील मोठ्या प्रमाणात होती. पोलीस अधिकारी अनिल कुमार यांनी माहिती दिली की, त्यांना फोन आल्यानंतर त्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्यांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र आढळून आले नाही.

दरम्यान, त्या भिकाऱ्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून त्याचे नाव बाशा असे आहे. मागील १२ वर्षांपासून तो या ठिकाणी भीक मागत होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तो स्थानिक दुकानदारांसाठी चिल्लर एजंट म्हणून देखील काम करत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी भिकाऱ्याचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेला असून त्याच्या जवळ सापडलेल्या पैशाचे काय करणार याबाबतीत मात्र कोणतही भाष्य केलेले नाही.

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 ‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

 रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार 

 

You might also like