पाकिस्तानात मतदानाला सुरुवात

नवी दिल्ली :वृत्तसंस्था

पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. मतदारांनी रांगा लावून प्रतिसाद दिल्याने निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्या दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

मतदानाला आज सकाळी प्रारंभ झाला. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. पंतप्रधान पदासाठी ‘तेहरीक ए इन्साफ’ पक्षाचे प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान, पाकिस्तान पिपल्स पार्टीचे बिलावल भुत्तो, पीएमएल-एन पार्टीचे शाहबाज शरीफ यांच्यात ही लढत होत आहे. पंतप्रधान पदासाठी इम्रान खान आघाडीवर असल्याची येथे चर्चा आहे. लष्करानेही खान यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’efefe2c7-8fd2-11e8-b54e-71f1abe6386d’]

पाकिस्तान निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार नँशनल असेंब्लीच्या २७२ जागांसाठी ३४५९ उमेदवार रिंगणात आहेत. चार प्रांतिक असेंब्लीच्या ५७७ जागांसाठी ८३९६ उमेदवार रिंगणात आहेत.