पुण्यातील मुजमुदार वाड्यातील गणेशोत्सवाला सुरुवात

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन

सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या शनिवारवाड्याजवळील मुजुमदार वाड्यातील गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे. यंदा या गणेशोत्सवाचे २५३ वे वर्ष असून भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून ते भाद्रपद शुद्ध पंचमी या कालावधीत हा गणेशोत्सव दरवर्षी साजरा होतो. शुक्रवारी ऋषिपंचमीला गणेशोत्सवाची सांगता होणार आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aed44f22-b5ce-11e8-a0b3-27543a5c0a1f’]

सरदार मुजुमदार यांच्या वाड्यातील गणेश महालामध्ये पारंपरिक पद्धतीने भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला दहा हातांच्या शस्त्रधारी वल्लभेष गणेशाची प्रतिष्ठापना होते. देवघरातून श्रींची पंचधातूची मूर्ती वाजतगाजत गणेश महालामध्ये आणून प्रतिष्ठापना केली जाते. या गणेशाच्या सर्व हातांमध्ये आयुधे असून, शारदेसह पितळी मखरात कमळावर ही मूर्ती आसनस्थ आहे. लघुरुद्र, ब्रह्मणस्पतीसूक्त आणि अथर्वशीर्ष आवर्तने होऊन दररोज पूजा केली जाते. ऋषिपंचमी म्हणजेच या उत्सवाच्या सांगतेच्या दिवशी रात्री तीर्थप्रसादाचे कीर्तन म्हणजेच लळीत झाल्यावर मखरावर पडदा टाकून मूर्ती देवघरात नेऊन ठेवायची, अशी मुजुमदार घराण्याची प्रथा आहे. आबासाहेब मुजुमदार यांचे नातू प्रताप मुजुमदार आणि नातसून अनुपमा मुजुमदार हे या उत्सवाची परंपरा जतन करीत आहेत.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b5ee3dd4-b5ce-11e8-bb59-5180f6ab6a50′]

उत्सवामध्ये दररोज सकाळी नऊ वाजता प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन होणार आहे. सोमवारी पुंडलिकबुवा हळबे यांचे कीर्तन झाले. यापुढे वासुदेवबुवा बुरसे, मिलिंदबुवा बडवे, मोरेश्वरबुवा जोशी चरोलीकर, ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांचे कीर्तन होणार आहे. यंदाच्या उत्सवात पेशवाईतील भांड्यांचे तसेच उत्सवात गाऊन गेलेल्या नामवंत गायकांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

पारंपारिक मंगलवाद्यांना गणेशोत्सावकाळात ‘अच्छे दिन’