उन्हाळ्यात नाचणी आंबिलचे सेवन आरोग्यदायी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उन्हाळ्यामध्ये नाचणीची आंबील पिणे आरोग्याकरिता लाभदायक असते. खेडेगावात तर उन्हाळ्यात दररोज हा पदार्थ बनतोच. आयुर्वेदिकदृष्ट्या नाचणीमध्ये द्रव अंश १३ टक्के असल्याने ते शीतल असते त्यात वसा मय द्रव कमी असल्याने पचण्यास हलके असते. पौष्टिक द्रव्याच्या दृष्टीने नाचणीमध्ये ७० ते ७३ टक्के असल्यामुळे तो गरिबांचा मांसाहार आहे असे म्हंटले जाते.

मुलांसाठी उत्तम ब्रेन टॉनिक
आपण अन्न घटकांचा विचार करताना राखेचा किंवा कार्बनचा विचार करत नाही. वास्तविक हाच घटक पित्तशामक असतो. आपल्याकडे पिकणारी परदेशी ओटस या दोन्हीमध्ये हे प्रमाण ३ टक्के असते. म्हणूनच पित्तशमनासाठी आपण आंबिल घेतो. मेंदूला चेतना देणारे काही घटक आहेत. उदा. विशिष्ट फॉस्फेटस ही केळी आणि नाचणी यात भरपूर असतात. म्हणूनच केळाचे दह्यामध्ये केलेले शिकरण आणि नाचणीची भाकरी ही लहान मुलांच्या (वाढीच्या वयात) वाढीसाठी अनुपम ब्रेन टॉंनिक आहे.

नाचणी धान्यामध्ये चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय भाग असल्याने बद्धकोष्ठता होत नाही. त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवेळी ग्लुकोज शर्करा हळू हळू रक्त प्रवाहात मिसळली जाते. नियमित नाचणी सेवन करणार्‍या लोकामध्ये हृदयरोग, आतड्यावरील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे.

सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि आहारातील अनियमिततेमुळे माणसांना निरनिराळ्या आजाराने ग्रासले आहे. त्यामध्ये मधुमेहाचा वरचा नंबर लागतो. मधुमेह हा आजार आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने नाचणीयुक्त आहाराला फार महत्त्वाचे स्थान आहे. नाचणी धान्यामध्ये असणार्‍या सत्त्वयुक्त अन्नघटकांचा विचार करता नाचणी हे धान्याचे पीठ तयार करून त्यापासून चपाती, रोटी, आंबील, शेवया, पापड अशा असंख्य स्वरूपाची मुल्यवर्धित उत्पादने भाजून, उकडून, वाफवून, किंवा अंबवून केली असता अत्यंत सत्त्वयुक्त होतात.