वाहतूक पोलिस, RTO ची ‘कटकट’ नको म्हणून ‘या’ बहाद्दरानं केलं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 सप्टेंबरपासून देशभरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याबाबत नवीन नियम लागू झाले आहेत. नवीन नियमानुसार, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास 10 पट अधिक दंड भरावा लागणार आहे. हे टाळण्यासाठी एकाने चक्क आपल्या स्कुटीलाच लायसन्स आणि विमा कागदपत्रे चिटकवली आहेत. सध्या हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर वाहतुकीच्या नव्या नियमांचे हसू झाले आहे.

Traffic

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकणी दिल्लीत राहणाऱ्या आणि गुडगाव कोर्टात काम करणाऱ्या दिनेश मदान यांना 23 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता. दिल्लीच्या गीता कॉलनीमध्ये राहणाऱ्या दिनेश मदान हे सोमवारी काही कामानिमित्त गुरगावला स्कूटीवरून गेले होते. जिल्हा न्यायालय इमारतीच्या समोरील सर्व्हिस रोडवर त्यांनी हेल्मेट काढले. तेथील पोलिसांनी मदान यांच्याकडे गाडीचे कागदपत्र मागितले. कागदपत्र नसल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या हाती 23 हजार रुपयांचा दंड आकारला होता.

विरोधाभास असा की या स्कूटीची एकूण किंमत सध्या 15 हजार रुपये तर दंडाची रक्कम 23 हजार रुपये. त्यामुळे मी इतकी रक्‍कम कशी भरणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच आता द‍िनेश या संभ्रमात आहे की स्कूटी सोडवण्यासाठी 23 हजार रुपये भरावेत की पुन्हा नवी गाडी घ्यावी. यासंदर्भात तो कोणताही निर्णय घेऊ शकले नाहीत. आपल्यावर अशी परिस्तिथी ओढवू नये म्हणून एका व्यक्तीने स्कुटीलाच लायसन्स आणि विमा कागदपत्रे चिटकवली आहेत. सोशल मीडियावर ही घटना चांगलीच व्हायरल होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त