सारा अली खान नाही, तर ‘ही’ अभिनेत्री आहे कार्तिक आर्यनची पहिली पसंत ; कार्तिकचा मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कार्तिक आर्यन बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. नुकताच कार्तिक लुकाछुपी या सिनेमात झळकला होता. कार्तिक नेहा धुपियाच्या चॅट शोमध्येही दिसला होता. यावेळी कार्तिकने अनेक गोष्टीचा खुलासा केल्याचे दिसून आले. यावेळी कार्तिकला एक प्रश्न विचारण्यात आला की, ज्यात त्याला अनन्या पांडे आणि सारा अली खानपैकी एकीला निवडण्यास सांगितले गेले. यावेळी कार्तिकने अनन्या पांडेला निवडले.

तुम्हाला सांगू इच्छितो की, कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे पती पत्नी और वो या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. याशिवाय अनन्याला निवडल्यानंतर कार्तिकने पुढे म्हटले की, “सध्या मी अनन्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. शिवाय मी तिच्यासोबत कामही करत आहे.” इतकेच नाही तर, या शोमध्ये कार्तिकला असेही विचारण्यात आले की, अनन्या पांडेची कोणती गोष्ट तुला आवडत नाही. यावर लगेचच उत्तर देत कार्तिक म्हणाला की, “ती सर्वांवर प्रेम करते आणि सर्वांचेच कौतुक करत असते.”

बॉलिवूड रिपोर्टनुसार, अनन्या पांडेचा डेब्यू सिनेमा स्टुडेंट ऑफ द ईयर 2 प्रदर्शित झाल्यानंतर कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. याशिवाय त्याने तिला बॉलिवूड पदार्पणासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या. कार्तिक आर्यन अनन्या आणि सारामुळे नेहमीच चर्चेत असतो.