पोलिसांनी ४५५ दारूड्यांची चांगलीच ‘जिरवली’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी निघालेल्या दारुड्यांची मुंबई पोलिसांनी चांगलीच जिरवली आहे. मुंबईत थर्टी फर्स्ट ते १ जानेवारी २०१९ सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांनी नशेडी ४५५ वाहनचालकांवर कारवाई केली. त्याचबरोबर वेगाच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या जवळपास १११४ जणांवर मुंबई पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०१९ ला सकाळी सहा वाजेपर्यंत नशेत वाहनं चालवणाऱ्या ४५५ चालकांना पकडलं. तर वेगाच्या मर्यादेच उल्लंघन करणाऱ्यांवर त्याचबरोबर वाहन परवाने नसणाऱ्यांवर वर दंडात्मक कारवाई केली असून. त्यांचे वाहन परवाने देखील जप्त करण्यात आले आहेत.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी १५३३ चालकांना पकडलं होतं. त्यातील ७६ जण दारुच्या नशेत होते. न्यायालयाच्या आदेशांनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.वाहतूक कोंडी होऊ नये किंवा बेदरकार वाहनचालकांना रोखण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आले होते.