बिग बॉसच्या कलाकारांना दहीहंडीत सर्वाधिक मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

बोल बजरंग बली की जय… हा गजर सोेमवारी आसमंतामध्ये गुंजणार आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली गोविंंदाची पथके दहीहंडी फोडण्यासाठी फिरणार आहेत. भाविकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या सेलिब्रिटींना आणून जास्तीतजास्त गर्दी खेचण्याची आयोजकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. बिग बॉसची लोकप्रियता अजूनही कायम असल्यामुळे या वर्षीच्या दहीहंडीत लाखो रुपये मोजून या  स्पर्धकांना आपल्या स्टेजवर आणण्याची धडपड आयोजकांनी सुरू केली आहे.

[amazon_link asins=’B01M1S58JT,B00BTQRLI8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dd0221db-ae6e-11e8-a94c-43a3b6a834b6′]

मुंबईत दहीहंडीचा जोर या वेळी पूवीर्पेक्षा थोडा कमी आहे. तरी लाखोंची बक्षिसे ठेवणाऱ्या राम कदम, प्रकाश सुर्वे या राजकारणी मंडळींनी आपल्या या वर्षीच्या उत्सवात बॉलीवूडबरोबरच मराठी सिताऱ्यांनाही खास आमंत्रित केले आहे. आतापर्यंत बॉलीवूडच्या चेहऱ्यांना पसंती देणाऱ्या आयोजकांनी या वर्षी मात्र मराठी सिताऱ्यांना मैदानात उतरवण्याचा चंग बांधला आहे. मागाठाणे भागात दरवर्षी भव्य दहीहंडीचे आयोजन करणारे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी रविना टंडनबरोबरच बॉलीवूडमध्ये सध्या लोकप्रिय असलेल्या मराठमोळ्या राधिका आपटेलाही आमंत्रण दिले आहे. अभिनेत्री श्रुती मराठे, अनिकेत विश्वासराव, तर बिग बॉसपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली स्मिता गोंदकरही या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. यासाठी आयोजकांनी या स्टार्सना लाखो रुपये मोजले आहेत.

ठाणे शहरात यंदा शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांसोबतच भाजपानेही पहिल्यांदाच भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले आहे. भाजपाच्या या उत्सवासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार त्यांची कला सादर करणार आहेत. सोमवारी रात्री सेलीब्रिटींची दहीहंडी हे येथील आकर्षण असेल. त्यात सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, रूपाली भोसले, मीरा जोशी, केतकी चितळे, राधा कुलकर्णी, स्मिता शेवाळे, सिया पाटील, मधुरा देशपांडे, प्रीती सदाफुले आणि माधवी निमकर हे कलाकार तसेच अभिजीत कोसंबी आणि अन्य चार गायक कलाकार यात सहभागी होणार आहेत.

अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवाकरिता उत्साहाचे वातावरण आहे. उच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधानंतर गोविंदा पथकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यामुळे गोविंदा पथकांना विमा काढण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीने कंबर कसली आहे.

त्यामुळे वैयक्तिकरीत्या आणि प्रायोजकांच्या माध्यमातून यंदा एकूण ९२१ गोविंदा पथकांनी विमाकवच घेतले आहे. मात्र, आयोजनाच्या परिसराचा विमा काढण्याकडे आयोजकांनी पाठ फिरवली आहे. केवळ ठाण्यातील तीन आयोजकांनी हा विमा काढल्याची माहिती दहीहंडी समन्वय समितीने दिली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड येथील केवळ ९२१ पथकांनी विमा काढला आहे.

एल्गार परिषदेच्या ‘त्या’ गुन्ह्याच्या तपासासाठी पूर्णवेळ पोलीस अधिकारी

जाहिरात