नगरमधून भाजपाचे डॉ. सुजय विखे, खा. गांधी यांचा पत्ता कट

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाने नगर लोकसभा मतदारसंघातून नुकताच भाजपात प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट झाला आहे. खा. गांधी यांचा पत्ता कट होणार, याबाबतचे सर्वप्रथम वृत्त ‘पोलिसनामा’ने 6 जानेवारा रोजीच प्रसिद्ध केले होते.

राष्ट्रवादीने नगरची जागा काँग्रेसला न सोडल्यामुळे डॉ. सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विखे यांनी उमेदवारीसाठी भाजपात प्रवेश केलेला असताना खा. दिलीप गांधी उमेदवारीसाठी आग्रही होते. त्यांनी दबावतंत्राचा वापर केला. मात्र त्यांचे प्रयत्न असफल ठरले. डॉ. सुजय विखे यांनाच पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.

खा. दिलीप गांधी यांचा पत्ता कट होणार, याबाबतचे वृत्त अडीच महिन्यांपूर्वीच ‘पोलीसनामा’ने प्रकाशित केले होते. त्यावेळी डॉ. विखे यांनी भाजपात प्रवेश करण्याबाबत चर्चाही सुरू झालेली नव्हती. खा. गांधी यांचे लोकसभा मतदारसंघात झालेला कमी जनसंपर्क व प्रभावीपणे काम न करता आल्यामुळे पक्ष दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात असल्याचा अंदाज ‘पोलीसनामा’ने वर्तविला होता. तो खरा ठरला आहे.

You might also like