देवदर्शनाला जाणाऱ्या २८ भाविकांची बोट गंगेत उलटली

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मासानिमित्त देवदर्शनाला घेऊन जाणाऱ्या २८ भाविकांची बोट उलटल्याची घटना घडली आहे. होडी चालकाने आणि बोटीतील इतरांनी प्रसंगावधान राखत वेळीच मदत केल्याने सर्व भाविकांचे प्राण वाचले. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर माजलगावजवळ पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला.

पुरुषोत्तमपुरी इथे लाखो भाविक दरवर्षी अधिक मासानिमीत्त जात असतात. हे ठिकाण गंगा नदीच्या पायथ्यालाच असल्यामुळे या ठिकाणी आसपासच्या गावातील भाविक हे बोटीने प्रवास करतात.आज सकाळी पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी घनसांगवी तालुक्यातील गोळेगाव येथील भाविक जात असताना होडी पलटी झाली. यावेळी होळीतील २८ भाविक गंगेत बुडाले.मात्र होडी चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली.बुडालेल्या भाविकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मात्र कोणत्या कारणामुळे ही बोट पलटी झाली हे अद्दाप समोर आले नाही.