उस्मानाबाद : नळदुर्ग किल्ल्यात बोट उलटली

तीन शाळकरी मुलांचा मृत्यू ...

नळदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये सकाळी 9 : 45 वाजता बोरी नदीमध्ये फरुख नय्यरआझम काझी यांचे कुटुंब बोटीमध्ये पर्यटनाचा आनंद लुटत असताना अचानक बोट पलटी झाली. त्यामध्ये एकुण 9 प्रवासी आणि बोट चालक असे 10 व्यक्ति होते .त्यापैकी 7 व्यक्ति पाण्यातून जिवंत सुखरुप बाहेर आले तर 3 प्रवासी मयत झाले असुन एक मुलगी पाण्यातून बाहेर काढून उपचारादरम्यान दवाखान्यात मरण पावले आणि 2 मुले पाण्यात बुडुन मयत झाले आहेत. त्यापैकी 1 मुलगी पाण्यातून 12:20 वाजता बाहेर काढले व 1 मुलगा पाण्यात आहे त्याला बाहेर काढण्याचे शोधकार्य चालू आहे. तिघांना पाण्यातून बाहेर काढण्यात शोधपथकास यश मिळाले.

सानिया फारुख काझी (वय वर्षे 8 ), इझान ऐसान काझी (वय वर्षे 5) रा. नळदुर्ग, अल्मस शफी जहागिरदार (वय वर्षे 10) रा मुंबई असे तीन मयत चिमुकल्यांची नावे आहेत. अल्मस शफी जहागीरदार हे नळदुर्ग येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या मामाकडे आली होती.

नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाँक्टरांच्या हलगर्जीपणा एका चिमुकलीचा अंत झाला असल्याचा आरोप नळदुर्ग शहरातील उपस्थित नागरिकांनी केला असुन नागरीकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर आक्रमक झाले होते तर कही काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तणाव निर्माण झाला होता .