हैदराबाद रेप केस : एन्काऊंटर झालेल्यांचे मृतदेह सडण्याची शक्यता, हॉस्पीटलची कोर्टात धाव

हैद्राबाद : पोलीसनामा ऑनलाइन – तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करणाऱ्या चारही आरोपींचे पोलिसांनी १४ दिवसांपूर्वी एन्काऊंटर केले होते. त्यांचे मृतदेह अजूनही रूग्णालयात जतन करण्यात आले आहेत. १४ दिवस होऊनही अजून मृतदेहाची तपासणी न झाल्याने हे मृतदेह खराब होण्याची भिती रूग्णालय प्रशासनाने व्यक्त केली आहे.

याप्रकरणी योग्य ते आदेश देण्याची मागणी रूग्णालय प्रशासनाने उच्च न्यायालयात केली आहे. हैद्राबादच्या गांधी हॉस्पिटलचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की, मृतदेह जतन करण्याबाबत फॉरेंसिक टीमने चिंता व्यक्त केली आहे. मृतदेह जास्त काळासाठी सुरक्षित ठेवता येणार नाहीत, असे म्हटले आहे. रूग्णालय प्रशासनाने न्यायालयाकडे मागणी केली आहे की, मृतदेहांच्या बाबत योग्य ते आदेश देण्यात यावेत.

फॉरेंसिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या या मृतदेहांची स्थिती ठीक असली तरी पुढे ते किती दिवस ठेवायचे आणि कसे ठेवायचे याबाबत विचार झाला पाहिजे. हैद्राबाद एन्काऊंटरनंतर सर्वोच्च न्यायालयाने तपास समित गठीत केली होती. ही समिती एन्काऊंटरची सत्यता पडताळणार आहे. कारण या एन्काऊंटरवर मृतांचे नातेवाईक तसेच अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/