मलकापूरच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह मध्यप्रदेशातील जंगलात आढळल्याने खळबळ, नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन –  बुलढाण्याच्या मलकापूर शहरातून ६ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १६ वर्षाच्या विद्यार्थीनीचा मृतदेह मध्य प्रदेशातील नेपानगर जंगलात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर रविवारी रात्री मोर्चा काढल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता.

मलकापूर शहरातील शिवाजीनगर भागातील १६ वर्षाची विद्यार्थीनी १३ जानेवारीला शाळेत जाताना बेपत्ता झाली. मलकापूर पोलिसांनी याप्रकरणी कलम ३६३ खाली अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, मध्य प्रदेशातील नेपानगरमधील जंगलात रेल्वे मार्गाजवळ या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. मध्य प्रदेश पोलिसांनी याची माहिती सर्वत्र पाठविली.

मृत मुलगी ही मलकापूरची असल्याचे रविवारी समजले़ या घटनेची माहिती तातडीने शहरात पसरली. या मुलीचे नातेवाईक आणि सुमारे २ हजार लोकांचा जमावाने मोर्चा काढत पोलीस ठाण्याला घेराव घातला. मुलीचा मृत्यु कशामुळे झाला. आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची मागणी संतप्त जमावाने केली.

फेसबुक पेज लाईक करा –