भुशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन

लोणावळा येथील भुशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह आज (शुक्रवार) दुपारी अडीचच्या सुमारास रेस्क्यु करुन बाहेर काढला. ठाणे येथील काही तरुण गुरुवारी (दि.२१) भुशी धरण परिसरात वर्षावीहारासाठी आले होते. त्यावेळी एक तरुण दुपारी तीनच्या सुमारास धरणात बुडाला होता. शिवदुर्ग रेस्क्यु टीमने या तरुणाचा शोध घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला.

सुरेंद्र तुकाराम कदम (वय 24, रा. दिवा, जि. ठाणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सदस्य सुनील गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र त्याचा भाऊ आणि अन्य पाच मित्रांसह लोणावळा येथील भुशी धरणावर काल (गुरुवारी) फिरण्यासाठी आले. दुपारी तीनच्या सुमारास सर्वजण धरणात पोहण्यासाठी उतरले. धरणातील पाणी कमी झाल्याने सर्वजण खोल पाण्यात पोहण्यासाठी गेले. तेथे सुरेंद्र याला दम लागल्याने त्याचा पाण्यात बुडाला. तो नेमका पोहता न आल्याने पाण्यात बुडाला की गाळात अडकल्याने बुडाला याबाबत निश्चित माहिती समोर आली नाही.

शिवदुर्ग टीमला याबाबत माहिती मिळताच टीमचे सदस्य साहेबराव चव्हाण, राजु पवार, राजेश तेले, आनंद गावडे, सागर कुंभार, अजय शेलार, प्रणय अंभोरे, प्रविण देशमुख, वैष्णवी भांगरे, अभीजीत बोरकर, राहुल देशमुख, विकास मावकर, अनिल आंद्रे, राजु पाटील, अनिकेत आंबेकर, दिनेश पवार, अतुल लाड, मधूर मुंगसे, प्रविण ढोकळे, अशोक उंबरे, अमोल परचंड, सागर पडवळ, निकीत तेलंगे, रोहीत वर्तक, सुनिल गायकवाड आदी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. काल दुपारपासून सुरेंद्रचा शोध घेणे सुरु होता. अखेर आज दुपारी अडीचच्या सुमरास त्याचा मृतदेह बाहेर काढ्यात शिवदुर्ग टीमला यश आले.