पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाले होते ‘या’ 10 कलाकारांचे मृतदेह, नंबर 1 होता ‘भाईजान’ सलमानचा मित्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवुड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी काही ना काही कारणासाठी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. आज आपण अशा दहा कलाकारांची माहिती घेणार आहोत, ज्यांचे मृतदेह पंख्याला गळफास घेतल्याच्या स्थितीत मिळून आले होते.

1 कुशल पंजाबी
37 वर्षांचा बॉलीवुड अ‍ॅक्टर कुशल पंजाबीने 27 डिसेंबररोजी मुंबईत आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर कुशलने हे पाऊल उचलले. कुशलने सलमान खान बरोबर जानेमन चित्रपटात काम केले आहे. शिवाय तो सलमानचा चांगला मित्रही होता.

2 सिल्क स्मिता
80 च्या दशकातील प्रसिद्धा आणि सुंदर अभिनेत्री सिल्क स्मिताने चित्रपटात काम मिळत नसल्याने 23 सप्टेंबर 1996 रोजी चेन्नई येथील आपल्या घरात आत्महत्या केली होती.

3 प्रत्युषा बॅनर्जी
टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला तिच्या बॉयफ्रेंडने फसवल्याने तिने 1 एप्रिल 2016 रोजी पंख्याला गळफास बांधून आत्महत्या केली होती.

4 नफिसा जोसेफ
मॉडेल आणि अभिनेत्री नफिसा जोसेफने तिच्या वर्सोवा लिंक रोड येथील अपार्टमेंटमध्ये 29 जुलै 2004 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. चित्रपटात काम मिळत नसल्याने तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.

5 राहुल दीक्षित
प्रसिद्ध अभिनेता राहुल दीक्षितचा मृतदेह त्याच्या मुंबईतील घरात पंख्याला लटकलेल्या आवस्थेत मिळून आला होता. यानंतर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

6 जिया खान
निशब्द आणि गजनी सारख्या चित्रपटांत दिसलेली अभिनेत्री जिया खानने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर जियाच्या कुटुंबियांनी आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोली यास आत्महत्येसाठी जबाबदार धरले होते.

7 विदिशा बेज
2017 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट जग्गा जासूसमधील अभिनेत्री विदिशा बेजने मिलेनियम सिटीच्या सेक्टर-43 मधील सुशांत अपार्टमेंटमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती.

8 सैय्यम खन्ना
बॉलीवुडची स्ट्रगलिंग अ‍ॅक्ट्रेस सैय्यम खन्ना (मोना खन्ना) ने 2014 मध्ये मुंबईत वर्सोव्यातील आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम न मिळाल्याने तिने हे पाऊल उचलले होते.

9 कुणाल सिंह
तमिळ चित्रपटांमध्ये प्रसिद्धा असलेल्या कुणाल सिंहचा मृतदेह 7 फेब्रुवारी 2008 ला मुंबईतील अपार्टमेंटमध्ये पंख्याला लटकलेल्या आवस्थेत मिळून आला होता. चित्रपटांमध्ये सतत मिळणार्‍या अपयशामुळे खचलेल्या कुणालने हे पाऊल उचलले होते.

10 कुलजीत रंधवा
टीव्ही अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल कुलजीत रंधवा ने 2006 मध्ये आर्थिक अडचणीमुळे त्रस्त होऊन मुंबईतील अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/