मुलगा व सुनेकडून आई-वडिलांना मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – ताथवडे आणि कोल्हापूर येथे असणारी संपत्ती विकून त्यातून येणारे पैसे देण्यास नकार दिल्याने आई-वडिलांना मुलगा आणि सुनेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी आई मीना विलास अवघडे (६०, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तर मुलगा प्रसाद विलास अवघडे आणि सून प्रियांका प्रसाद अवघडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा प्रसाद आणि सून प्रियंका विभक्त राहतात. सोमवारी रात्री दोघे आई-वडिलांच्या थेरगाव येथील घरात जबरदस्तीने घुसले. वडील विलास अवघडे यांच्याकडे पुनावळे आणि कोल्हापूर येथील संपत्ती विकण्याची मागणी केली.

तसेच संपत्ती विकून येणाऱ्या पैशात हिस्सा देण्यासाठी धमकावले. त्यासाठी विलास अवघडे व मीना अवघडे यांनी नकार दिला असता मुलगा आणि सूनेने त्यांना मारहाण केली. तसेच घरातील साहित्याचे (सामानाचे) नुकसान केले. तपास वाकड पोलिस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like