अन् त्याने आईच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक  

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भावाला टोमणे मारुन बोलत असताना आईने असे का बोलतो, असे विचारल्यावर चिडून त्याने चक्क सिमेंटचा ब्लॉक आईच्या डोक्यात घालून तिला जबर जखमी केले. या घटनेमुळे आई काही तास बेशुद्ध पडली होती. ही घटना पिंपळे गुरव येथील राजीव गांधी नगरात मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली होती.
याबाबत सांगवी पोलिसांनी अमित अरुण भुजबळ (वय ३५) याच्याविरुद्ध गुन्हा  दाखल केला. याप्रकरणी श्यामल अरुण भुजबळ (वय ५५, रा. राजीव गांधीनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, श्यामल भुजबळ या धुणीभांडीची कामे करुन घराला हातभार लावतात. मंगळवारी सकाळी ११ वाजता त्या घरात असताना अमित त्यांच्या घरी आला. तो त्याच्या भावाला टोमणे मारत बोलू लागला. तेव्हा त्याची आई अमितला म्हणाली, असे का बोलतोस. त्यावर अमित याने चिडून जाऊन घराच्या बाहेरील सिमेंटचे ब्लॉक घेऊन आईच्या डोक्यात मारला. वर्मी घाव बसल्याने त्या बेशुद्ध पडला. उपचारानंतर काही वेळाने त्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.भाजप नगरसेवकाची वृद्ध महिलेला बदेम मारहाण