‘या’ गावात साडेचार वर्षांपासून मतदानावर होता बहिष्कार आता लोकसभा निवडणुकीत होणार मतदान

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – भोकर येथील ग्रामस्थांचा निर्णय साडेचार वर्षांनंतर अत्ता होणार मतदान येथील मतदारांनी लोकसभा निवडणूक २०१९ करिता मतदान करावे याबाबत चर्चा व मार्गदर्शन पवन चांडक (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, ८५-भोकर तथा उपविभागीय अधिकारी भोकर), सिद्धेश्वर भोरे (उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर), भरत सूर्यवंशी (तहसीलदार भोकर), एच. एम. गोपुलवाड (उपविभागीय जलसंधारण अधिकारी, भोकर), विकास पाटील (पोलीस निरीक्षक भोकर), ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. कांबळे व इतर.ग्रामस्थामार्फत श्री. नरसय्या मेंडेवाड यांनी बाजू मांडली.

मौ. दिवशी (बु )इथे साडेचार वर्षांपासून मतदानावर बहिष्कार होता. मतदारांनी जिल्हापरिषद/ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केलेले नव्हते. सदरील ग्रामपंचायतसाठी सरपंचाची निवड न झालेल्या प्रशासकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत.बैठकी मध्ये प्रशासनातर्फे एच. एम. गोपुलवाड (उपविभागीय जलसंधारण अधिकारी, भोकर) यांनी सिंचन तलावाची मागणी मान्य झाल्याचे जाहीर केले.

तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरणचे काम, पांदण रस्त्याबाबतचे काम व तसेच बंधाऱ्यास ऑटोमॅटिक गेट बसविण्याचे कामाबाबत प्रशासकीय अधिकारी यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला व तसेच लोकसभा निवडणुक हा सर्वात मोठा राष्ट्रीय सण असल्यानेव उपस्थित वरिष्ठ अधिकारी आणि मौ. दिवशी बु. येथील मतदारांत सकारात्मक संवाद झाल्याने मतदारांनी एकमताने मतदानाचा हक्क बजाविण्याचे ठरविले आहे.

ह्याही बातम्या वाचा –

विश्रांतवाडीत एटीएम फोडताना तरुण रंगेहात जाळ्यात

‘त्या’ वृद्धाच्या शरीरातून काढले तब्बल ५५० मुतखडे

Video Viral : जॅकलीनचा बेली डान्स चाहत्यांना करतोय घायाळ

सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठरणार लोकसभा प्रचाराची दिशा

गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार गजाआड