आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून ‘वधू’ला घेऊन आला ‘वर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आजीच्या इच्छेनुसार दोन नातवंडांनी त्यांचा मान राखत एक अनोखे काम केले आहे. आजीची इच्छा होती की लग्नानंतर त्यांच्या सुना हेलिकॉप्टरमधून घरी याव्यात, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून सुना लग्नानंतर गावात पोहोचल्या जिथे हेलिपॅड बनविण्यात आले होते. ही घटना राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील आहे.

कोटामध्ये गुरुवारी एका कुटुंबात वधू-वरांसाठी हेलिकॉप्टर सारथी बनले. जिथे लग्न समारंभात सर्व प्रोटोकॉल पाळले जात आहेत, त्याचवेळी कोटामध्ये एका आजीच्या इच्छेने नातवंडांच्या लग्नात हेलिकॉप्टर उडवले. अशोक मालव यांच्या कुटुंबातील लग्नात हे दृश्य पाहायला मिळाले. अशोक यांचा मोठा मुलगा पंकजचे लग्न भवानीपुरा निवासी कोमल व लहान मुलगा ललितचे लग्न दीपपुरा निवासी रश्मिताशी झाले.

लग्नानंतर या दोन्ही जोडप्यांना हेलिकॉप्टरने देवळी अरब या गावी उतरवण्यात आले. जिथे हेलिपॅड बनविण्यात आले होते. ज्या मॅरेज गार्डनमध्ये लग्न झाले, तिथेही तात्पुरत्या स्वरूपाचे हेलिपॅड बनविण्यात आले होते. दोन्ही वरांचे वडील अशोक मालव यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची आणि त्यांच्या आईची इच्छा होती की, सुनांना हेलिकॉप्टरने घरी आणले जावे, आईची इच्छा पूर्ण करण्यात आली आहे.

You might also like