खळबळजनक ! बीडमध्ये दगडानं ठेचून युवकाचा खून, ‘धडा’पासून वेगळं केलं ‘शीर’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – हैदराबादहून अंबाजोगाईला खाजगी कामानिमित्त आलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सोमवारी सायंकाळी दासोपंत समाधी परिसरात घटना उघडकीस आली. खूनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रसूल सत्तार कुरेशी (वय 32 )असे खून झालेल्याचे नाव आहे.

अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्ली या ठिकाणचे रहिवाशी होते. खिशातील कागदपत्रांवरून तो रसूलच असल्याची ओळख त्याच्या कुटुंबीयांनी पटविली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर ठाण्याचे सह. पोलीस निरीक्षक दहिफळे आणि उपनिरिक्षक सोळंके यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली.

 नागपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून कात्रीने तरुणीवर वार
एकतर्फी प्रेमातून तरुणावर कात्रीने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट इथे घडली आहे. हल्ला करून पळ काढणार्‍या तरुणाला गावकर्‍यांनी पकडले आणि बेदम धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. एका फार्मसीमध्ये 20 वर्षीय तरुणी साफसफाईचे काम करते. नेहमीप्रमाणे आज सकाळी ती कामासाठी पोहोचली.

काही वेळानंतर आरोपी शुभम काकडे(वय 23) तिथे पोहोचला. त्याने या तरुणीशी वाद घातला. त्यानंतर दुकानातील कात्रीने तरुणीवर हल्ला चढवला. तिने आरडाओरडा केल्यानंतर शेजारील दुकानदार आणि फार्मसीच्या मालकाने धाव घेऊन आरोपी तरुणाच्या तावडीतून सुटका केली.