पाठीत गोळी घुसली मात्र 3 दिवस झाडाखालीच राहिला पडून

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – नवी दिल्लीतील नरेका भागात साईटवर चोरी करण्याच्या हेतूने आलेल्या व्यक्तीला गार्डने गोळी मारली. गोळी त्याच्या पाठीला लागली  मात्र घाबरून तो तीन दिवस झाडांच्या आडोशाला तसाच पडून राहिला.

नरेका भागातील डीडीए कनस्ट्रक्शन साईटवर रात्री ११ वाजता बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत दोघे जण शिरले. साईटवर कोणीतरी चोर आल्याचे कळताच गार्डने अंदाजाने गोळी झाडली. नेमकी हि गोळी चोराच्या पाठीवर लागण्याने तो जागीच कोसळला. आता आपण पकडले जाऊ शकतो या भीतीने तो त्या जागीच पडून राहिला. आपला जीव वाचवण्यासाठी तब्बल तीन दिवस तेथेच जखमी अवस्थेत पाठीवरील गोळीसह पडून राहिला. त्या चोराचे नाव अमित असे असून. कुटूंबियांनी सांगितल्याप्रमाणे तो पाच दिवस घरी आला नाही. त्याला अमली पदार्थांचे व्यसन असून, यापूर्वीही तो दोन वेळा चोरीच्या प्रकरणात तुरुंगात गेला आहे.

अमितला भिंतीवरून उडी मारताना पाठीवर गोळी लागल्याने तो तिथेच झाडांच्या आड पडून राहिला. त्याच्यासोबत असणारा त्याचा मित्र त्याला त्याच अवस्थेत तिथे सोडून पळून गेला. त्याने याबाबत कोठेही बोलले नाही. रविवारी अमितला रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व घटना स्पष्ट झाली. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like