ऐन चकमकीत गोळीच चालली नाही, पोलिसांनी तोंडाने काढला गोळ्यांचा आवाज

संभल (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हेगारांचा एनकाऊंटर करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, ऐन चकमकीच्या वेळी पोलिसांच्या रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली नसल्याने पोलिसांना स्वसंरक्षणार्थ तोंडाने गोळ्यांचा आवाज काढण्याची वेळ आली. गुन्हेगारांकडून होत असलेल्या गोळीबाराचे उत्तर पोलिसांनी तोंडातून आवाज काढून दिल्याने उत्तर प्रदेश पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’80d67033-cef0-11e8-8f76-a5df83114b7d’]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पोलीस गाड्यांची तपासणी करत होते. त्यावेळी एका गाडीत दोन लोक होते, त्यांनी पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी यांना एका शेतात कोंडीत पकडले. तेव्हा या गुन्हेगारांनी पोलिसांवार गोळीबार केला. स्वरंक्षणार्थ पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला तेव्हा एक गुन्हेगार जखमी झाला. नंतर पोलिसांच्या पिस्तुलातील गोळी सुटत नव्हती. पण त्याला दहशत दाखवण्यासाठी पोलिसाने तोंडाने गोळ्यांचा आवाज काढला आणि त्याला घाबरवले. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याच्यावर २५ हजारांचा इनाम होता. या चकमकीत एक पोलीस निरीक्षक आणि शिपाई जखमी झाले आहेत. या चकमकीत दुसरा गुन्हेगार पळण्यात यशस्वी झाला.

[amazon_link asins=’B01IBM5V66′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8886849e-cef0-11e8-864d-0ba94a6203e8′]

पोलिसांनी अटक केलेल्या गुन्हेगाराकडे एक चारचाकी वाहन, गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव मुदित शर्मा असून त्याच्यावर डझनभर गुन्हे दाखल आहेत.

चंदिगढमध्ये शीख महिलांना हेल्मेटसक्तीतून केंद्राची सूट

चंदिगढ : चंदिगढमध्ये शीख धर्मीय महिलांना यापुढे दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याची सक्ती नसेल. दिल्ली सरकारने जारी केलेली अधिसूचना पाळण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितलं आहे.पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी गुरुवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर शीख महिलांना स्कूटर चालवताना हेल्मेट घालण्यापासून सूट देण्यात आली.पगडीधारी शीख महिला वगळता सर्व महिलांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक असल्याचं चंदिगढ प्रशासनाने 6 जुलै रोजी अधिसूचना काढून सांगितलं होतं. मात्र धार्मिक कारणास्तव शीख धर्मीयांनी याला विरोध केला होता. आता फक्त पगडीधारीच नाही, तर पगडी परिधान न करणाऱ्या शीख महिलांनाही दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याची सक्ती नसेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चंदिगढ मोटर वाहन नियमात बदल करण्यात आले.

९०० IAS ऑफिसर घडविणाऱ्या शंकर यांच्या आत्महत्येनं खळबळ