दफन केलेल्या ‘त्या’ भ्रूणांचे अवशेष ‘डीएनए’ साठी प्रयोगशाळेत

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

सांगलीतील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये महिलांचा गर्भपात केल्यानंतर दफन केलेल्या भ्रूणांचे अवशेष ‘डीएनए’ साठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात दफन केलेल्या भ्रूणांच्या अवशेषांचा शोध घेतला जात आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’125297e5-c3c0-11e8-a93b-8bb4370800af’]

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने पंधरा दिवसापूर्वी चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकून गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आणले होते. याप्रकरणी डॉ. रुपाली चौगुले तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले, विट्यातील डॉ. अविजीत महाडिक औषध विक्री प्रतिनिधी सुजीत कुंभार यांना अटक केली होती. डॉ. रुपालीचा भाऊ डॉ. स्वप्नील जमदाडे हे फरारी आहेत. विट्यातील डॉ. ऋषिकेश मेटकरी या आणखी एका डॉक्टरचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या हॉस्पिटलवर छापा टाकण्यात आला. मात्र तो सापडला नाही. डॉ. महाडिक व मेटकरी गर्भवती महिलांचे गर्भलिंगनिदान करुन त्यांना चौगुले हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी पाठवित असल्याचा संशय आहे.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’177ee798-c3c0-11e8-980d-d940028bf75b’]

गर्भपात केल्यानंतर नातेवाईकांनीच भ्रूणांची विल्हेवाट लावल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. नातेवाईकांनी हे भ्रूण त्यांच्या शेतात अथवा अन्यत्र ठिकाणी दफन केले आहेत. गर्भपात केलेल्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील २५ महिलांचे आतापर्यंत जबाब घेण्यात आले आहेत. महिलांच्या पतीकडून भ्रूण दफन केलेली सापडली आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात खुदाई करुन भ्रूणांचा शोध घेतला. सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी, जांभळी व जयसिंगपूर, इचलकरंजी, हातकणंगले आदी गावात खुदाई करण्यात आली. यापैकी एका गावात भ्रूणांचे अवशेष सापडले आहेत. संबंधित महिलेच्या रक्ताचे नमुने व या भ्रूणांचे अवशेष ‘डीएनए’साठी पाठविण्यात आले आहेत. अवशेष सापडल्याने तपासात हा मोठा पुरावा मानला जात आहे.

औरंगाबादमध्ये हर्षवर्धन जाधव विरुद्ध चंद्रकांत खैरे ‘सामना’ रंगणार
एल्फिन्स्टन दुर्घटना: रेल्वेमंत्र्यांच्या घोषणा आणि वास्तव