धुळे : अजनाडे बंगला जवळ ‘द बर्निग कार’ सुदैवाने जिवीत हानी टळली

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – द बर्निंग कार सुदैवाने जिवीत हानी टळली. जिल्ह्यातील अजनाडे बंगला रस्तावर धावत्या कारने पेट घेतला. हि बाब तेथील नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. कार मध्ये जळगाव येथील रविंद्र विराणी कुटूंबिय देवदर्शनासाठी जाताना घडली.

कार मध्ये आग लागल्याचे लक्षात येताच गाडीतील पाच जण चटकन बाहेर पडले. कार आगीच्या भक्षस्थानी सापडली. सुदैवाने जिवीत हानी टळली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लोकांनी बादलीने पाणी मारा करुन आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतू तो फारसा उपयोगी ठरला नाही.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like