अपघातात धावत्या मोटारतून पतीनं मारली ‘उडी’, पत्नीचा जळून ‘कोळसा’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मोटारीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चालकाने एका पादचार्‍यासह दुसर्‍या वाहनाला धडक दिली. त्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीने चालकाने वेगाने मोटार पळविली. दुदैवाने धावत्या मोटारीने पेट घेतला. त्यामुळे चालकाने मोटारीतून उडी मारुन जीव वाचविला. मात्र, सीटबेल्ट बांधला असल्यामुळे पत्नीला मोटारीबाहेर पडता आले नाही. परिणाामी एका महिलेचा जळून मृत्यू झाला आहे. ही घटना बेळगाव-सावंतवाडी रस्त्यवरील आंबोली घाटातील मुख्य धबधब्यालगत रस्त्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव येथील दाम्पत्य मोटारीतून बुधवारी संध्याकाळी आंबोली मार्गे गोव्याला जात होते. मोटार आंबोली- नांगरतास येथे आली असता चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने एका पादचार्‍यासह दुसर्‍या वाहनाला धडक दिली. पकडले जाणार या भीतीने चालकाने वेगाने मोटार चालविली. त्यामुळे मोटारीला आग लागल्याचे पाहताच त्याने मोटारीतून उडी मारुन जीव वाचविला. दुसर्‍या बाजूला मोटार चालकाची पत्नी सीटबेल्ट लावून बसली होती. त्यांना मोटारीतून उडी मारता आली नाही. त्यामुळे जळून त्यांचा मृत्यू झाला आहे.