कंपनीच्या कॅशिअरनेच चोरली कंपनीची रोकड आणि विदेशी चलन

पुणे : पोलीसनामा ऑनाईन

वेग वेगळ्या देशांच्या करन्सीचे काम करणाऱ्या कंपनीतील कॅशिअरने ५ लाखांची रोकड आणी विदेशी चलन चोरुन नेल्याची घटना उघकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१९) रात्री सहाच्या सुमरास येरवडा येथील थॉमस कुक लि.मी. या कंपनीत घडली. या प्रकरणी कंपनीच्या कॅशिअरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल अनिल पुठा (वय-३५ रा. रुक्मीनी मंदीराच्या पाठीमागे, महंमदवाडी, हडपसर) असे विदेशी चलन चोरणाऱ्या कॅशिअरचे नाव आहे. याप्रकरणी अमोल अशोक डहाके (वय-४० रा. कोंढवा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी अशोक डहाके हे येरवडा येथील थॉमस कुक लि.मी. या कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. तर आरोपी विशाल पुठा हा कॅशिअर म्हणून काम करतो. थॉमस कुक ही कंपनी वेग वेगळ्या देशांच्या करन्सीचे काम करते. तसेच वेग वेगळ्या देशाची करन्सी कंपनी प्रत्येक शाखेला व्यवहार पूर्ण करण्यासाठी देते. थॉमस कुक कंपनीच्या येरवडा शाखेलाही करन्सी देण्यात आल्या होत्या. कॅशिअर विशाल पुठा याने कंपनीतील ४ लाख ७५ हजार सहाशे एकोणीस रुपयांची रक्कम आणि युएस डॉलर, ब्रिटन पाऊंड, युरो, जपानचे येन, कॅनडा डॉलर, ऑस्ट्रेलीयाच डॉलर असे वेगवेगळ्या देशाची चोरुन नेली. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या-