सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सीबीएसई बोर्डाचा १२वी चा परीक्षांचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला. आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) 10वी च्या परीक्षेचा निकाल उद्या संध्याकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल cbse.nic.in या वेबसाइटरवर पहिल्यांदा जाहीर करण्यात येणार असल्याचीही माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका अधिका-याने दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चे 10वी आणि 12वीचे पेपर फुटले होते. त्यामुळे त्या पेपर फुटलेल्या विषयांच्या फेरपरीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याच वेळी दिल्ली व हरियाणा वगळता इतर राज्यातील 10वीच्या मुलांना दिलासा देण्यात आला होता. 12वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची 25 एप्रिलला पुनर्परीक्षा घेण्यात आली होती. परंतु दहावीच्या गणिताच्या पेपरची फक्त हरियाणा आणि दिल्लीतच फेरपरीक्षा झाली होती. सीबीएसई बोर्डाच्या १२ वी च्या निकालात मुलींनी बाजी मारली होती. आता १० वी च्या निकालात कुणाची बाजी असेल हे उद्या कळेल.