केंद्र सरकारचा प्रस्ताव, ‘या’ गाडयांसाठी ‘रजिस्ट्रेशन फी’ नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इलेक्ट्रिक गाडी घेऊ इच्छिणाऱ्यासाठी एक आनंदाची बाब आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक गाडीच्या खरेदी रजिस्ट्रशन चार्ज माफ होणार आहे. नीती आयोगाने 2030 नंतर फक्त इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीचा प्रस्ताव दिला आहेत तर सरकारने देखील इलेक्ट्रिकल गाड्यावर रजिस्ट्रेशन चार्ज माफ करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. जेणेकरुन इलेक्ट्रिकल गाड्यांच्या खरेदीत वाढ होईल. सरकार इलेक्ट्रिकल गाड्याच्या वापराला प्रोस्ताहन देऊ इच्छित आहे.

सेंट्रल मोटार वेहिकल रुल (CMVR) 1989 संशोधनासाठी नवे ड्रफ्ट नोटीफिकेशन जारी करत सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने सांगितले की, बॅटरीवर चालणाऱ्या गाड्याच्या रजिस्ट्रेशन फी वर सूट देण्यात येईल. ही सूट नव्या रजिस्ट्रेशनसाठी आणि रजिस्ट्रेशन रिन्युअल अशा दोन्ही साठी असेल. ही सूटमध्ये टू व्हिलर सहित सर्व कॅटेगिरीच्या गाड्यावर लागू होईल. मंत्रालयाने CMVR च्या संशोधनासाठी नवे ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केले आहे. ज्यात अशा सूटीसाठी नियम 81 मध्ये संशोधन करण्यात येईल.

हा प्रस्ताव लागू होण्याआधी सरकारला स्टेकहोल्डर्सकडून एक महिन्याआधी सुधार आणि अपत्ती मागवाव्या लागतील. मानले जात आहे की, प्रस्ताव लागू केल्याने इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त होतील. त्याचा वापर देखील वाढेल.

मागील वर्षी नितीन गडकरी यांनी सांगितले होते की, इलेक्ट्रिक गाड्यांच्या उत्पादनाला प्रोस्ताहन द्यायचे आहे. पुढील 5 वर्षात एकून ऑटोमोबाइलच्या हिशात इलेक्ट्रिक गाड्याचा हिसा 15 टक्के असेल.

आरोग्य विषयक वृत्त –

या कारणामुळे होतो ” ब्रेस्ट कॅन्सर “जाणून घ्या याची लक्षणे

प्रदूषणापासून करा ” केसांचा ” बचाव

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …!

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त