संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीवरून मुख्यमंत्र्यांनी उडवली अजित पवारांची ‘खिल्ली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीवरून वादंग उठले असताना विधीमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधरी व विरोधक यांनी एकमेकांची खिल्ली उडवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणिताच्या पुस्तकातील बदलाला आपला विरोध दर्शवत फडणवीस नावावरून उदाहरण दिले. त्यावर आपण लहान असताना देखील ‘अजित कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण’, असे शिकलो होतो, असा टोला मुख्यमंत्र्यानी लगावला. मात्र या नावांचा कुणाशीही संबंध जोडू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बालभारतीच्या दुसरीच्या गणिताच्या पुस्तकातील संख्यावाचनाचा हा बदल रद्द करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी विधानभवनात केली होती. ही मागणी करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही खिल्ली उडवली. फडणवीस यांच्या आडनावाचा उच्चार आता, फडण दोन शून्य असा करायचा का असा चिमटा त्यांनी काढला होता.

अजित पवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी त्याच भाषेत उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी त्याची परतफेड केली. पहिलीच्या बालभारतीतीत पुस्तकातील आई कमळ बघ, दादा कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण, हसन पटकन उठ असे उतारे त्यांनी वाचून दाखविले. तसेच या नावाचा कुणाशीही संबंध जोडू नये असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर अजित पवार यांनी मध्येच ‘घड्याळ बघ’ असेही वाक्य असल्याचे सांगितले. यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

बदलेल्या अभ्यासक्रमाबाबत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना सुलभरितीने अंकगणित समजावे यासाठी हा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (विद्यापरिषद) ही स्वायत्त संस्था अभ्यासक्रमातील बदल ठरवत असते. सरकारचा त्यात कोणताही हस्तक्षेप नसतो. विद्यापरिषदेच्या वतीने तज्ज्ञ व्यक्ती अभ्यासक्रम ठरवत असतात. या पद्धतीवर तज्ञांनीही वर्तमानपत्रात लेख लिहून आपल्या पद्धतीचे समर्थन केलेले आहे. सभागृहाची सदर पद्धत बदलण्याची इच्छा असेल तर तज्ज्ञ लोकांची समिती नेमली जाईल आणि या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असा अहवाल त्यांनी दिला तर त्यात बदल करू’, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

आरोग्यविषयक वृत्त –

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …! 

आजपासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर ‘या’ आसनांपासून करा सुरुवात 

मधुमेह, मानसिक आजार आणि हृद्यरोगाला दूर ठेवण्यासाठी करा हे “प्राणायम” 

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी ”