मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी जनतेला संबोधित करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढला आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. तसेच राज्यात मृत्यूचे प्रमाण देखील अधिक आहे. यावरून राज्य सरकारने १ मे चा लॉकडाऊन आता १५ मे पर्यंत वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी राज्यातील जनतेशी सवांद साधणार आहेत.

तसेच, राज्यातील लसीकरण मोहीम आणि कोरोना प्रतिबंधासाठी राज्याची तयारी याबाबत मुख्यमंत्री बोलणार असल्याची शक्यता आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वाना खुले करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियोजन आणि धोरण याविषयी जनतेला संबोधित करणार आहेत. या दरम्यान, ऑक्सिजनची- रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धता आणि राज्याच्या एकूणच नियोजनाबाबत मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत.