मुलानं वडिलांच्या फोनमध्ये टाकला Password, नंतर तो विसरला, आता घडली ‘ही’ घटना

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – सांपल्याच्या गांधार मोर जवळ वसाहतीत राहणाऱ्या कुटूंबामधील 11 वर्षाचा मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सांपला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या वडिलांचे नाव बच्चालाल आहे त्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या 11 वर्षाच्या मुलाने त्यांचा मोबाइल फोन घेतला होता. यादरम्यान त्याने फोन नंबर लॉक करून पासवर्ड ठेवला. पण काही वेळानंतर मुलगा तो पासवर्ड विसरला होता.

यामुळे त्याला असे वाटले की, फोन लॉक केल्यावर घरातील लोक त्याला मारतील. त्यामुळे घरातील लोक मारतील या भीतीने न सांगता तो घरातून कुठेतरी निघून गेला. यूपीमधील मिर्जापूर येथील बच्चालाल यांनी पुढे सांगितले की, ते मागील काही वर्षांपासून सांपला येथील गांधार मोर येथे एका कंपनीत काम करत आहेत. तो कुटुंबासमवेत कंपनीजवळील घरात राहतो.

त्यांचा मुलगा ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी त्यांच्याकडून अनेकदा मोबाईल फोन घेत असे. दोन दिवसांपूर्वीच त्याने त्यांच्याकडून अभ्यासासाठी फोन घेतला होता. मुलाला फोन दिल्यानंतर तो कंपनीतल्या ड्युटीवर गेला. परत येतांना समजले की, त्याचा मुलगा घरातून कुठेतरी बेपत्ता होता. त्यानंतर सायंकाळपर्यंत तो परतला नाही. नंतर मोबाईल फोनच्या लॉकचा पासवर्ड विसरल्यानंतर त्याला मारतील अशी भीती मुलाच्या मनात निर्माण झाल्याचे समोर आले. ज्यामुळे तो काहीच न सांगता घराबाहेर निघून गेला.

You might also like