नागपुरात मुले पळवणाऱ्या टोळीचे सदस्य समजून जमावाकडून महिलेला मारहाण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात मुले पळवून नेणाऱ्या टोळीतील व्यक्ती  समजून निर्दोष व्यक्तीना  मारहाण केल्याचे प्रकार थांबायलाच तयार नाहीत. धुळ्याचा याच अफवांवरून पाच जणांची हत्या झाल्यानंतर नागपुरात देखील पारशिवनी इथे जयश्री रामटेके नावाच्या महिलेला जमावाने अशाच संशयावरुन मारहाण केली. मात्र, पोलिस वेळेवर आल्याने तिचा जीव वाचला.[amazon_link asins=’B01GJRMD8O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a4432c46-804e-11e8-b385-e11b64ecfa3c’]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जयश्री रामटेके नामक नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाणे  हददीतील हुडको कॉलनी येथे राहतात. ही महिला बुधवारी पारशिवनी तालुक्यातील करंभाड गावात जयश्री वस्तीतून जात होत्या तेव्हा लहान मुले आजूबाजूला खेळात होती. जयाश्री रामटेके पक्षाघात झालेल्या रुग्णांना तेल मालिश करण्याचे  काम करतात. याचा कामानिमित्त त्या  जात असताना त्यांची वेशभूषा पाहून मुलांनी चोर -चोर असे ओरडण्यास  सुरुवात केली. मुलांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे त्याठिकाणी महिला -पुरुष जमा झाले. त्यांनी जयश्रीला  घेरुन प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. सध्या मुलं चोरणाऱ्या टोळीची अफवा असल्याने जमावाने तिला चोर समजून मारहाण करण्यास सुरुवात केली.

या प्रकरणाची माहिती मिळताच , सहाय्य्क पोलीस उपनिरिक्षक दिलीप आगरकर आणि महिला पोलीस कर्मचारी संगीता घटनास्थळी दाखल झाल्या . यावेळी तेथे २०० जणांचा जमाव होता. त्यानंतर तातडीने संगीता यांनी जयश्री यांना जमावाच्या तावडीतून सोडवून घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणले.सुदैवाने आज पोलिस  वेळेत हजर झाल्यामुळे अनर्थ टळला.
जाहिरात