‘कोरोना’ला दूर ठेवण्याची प्रतिज्ञा घेऊन बालगोपाळांनी घेतला ख्रिसमसचा आनंद

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे शहरात बालगोपाळांसाठी आनंदाची पर्वणी असणारा पुणे नवरात्रौ महोत्सव आयोजित ख्रिसमस ( Christmas ) संध्या हा कार्यक्रम यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याचे पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल (Aba Bagul) यांनी सांगितले असून दरवर्षी ८ ते १० हजार मुलांचा यामध्ये सहभाग असतो. गेली २१ वर्ष सातत्याने वसंतराव बागुल उद्यान शिवदर्शन- सहकारनगर येथे ख्रिसमस ( Christmas ) संध्याचे आयोजन करण्यात येते. यामध्ये मुलांना ख्रिसमस  ( Christmas ) कॅप, केक, पोपकोर्न, बग्गी राईड,कॅमल राईड,जादूचे प्रयोग व डान्सची पर्वणी अनुभवायास मिळते. पुणेकर या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात हे देखील या ख्रिसमस ( Christmas ) संध्याचे वैशिष्ट्य आहे. असे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल (Amit Bagul) म्हणाले.

परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदर्शन वसाहती मधील बालचमूंसोबत ख्रिसमस साजरा करण्यात आला असून या मुलांना सांताक्लॉजचे मुखवटे,मास्क, सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. कोरोना विषयक नियमांचे पालन करूया, मास्क वापरून कोरोनाला दूर ठेऊया अशी प्रतिज्ञा करत या बालचमूंनी ख्रिसमसचा आनंद लुटला असे अमित बागुल यांनी सांगितले.

याप्रसंगी राहुल बागुल,सागर आरोळे,महेश ढवळे, इम्तियाज तांबोळी,धनंजय कांबळे,बाबासाहेब पोळके, संतोष पवार, सुरज सोनावणे,अक्षय नाईकनवरे आदी उपस्थित होते.