कलयुग !…म्हणून मुलाची आईला ‘या’ कारणासाठी मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आयुष्यभर खस्ता खाऊन मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ करावा, अशी आई वडिलांची अपेक्षा असते. मात्र, अनेकदा मुलगा कृतघ्न निघतो. जेवण कमी पडले म्हणून मुलाने आपल्या आईला मारहाण करण्याची घटना कोंढव्यात घडली. मुलाच्या या प्रकाराने शेवटी वडिलांनीच आपल्या मुलाविरुद्ध कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली असून कोंढवा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

रवि चंद्रकांत सरतापे (वय ३०, रा़ नताशा एनक्लेव्ह, एनआयबीएम रोड, कोंढवा) असे त्याचे नाव आहे. त्याचे वडिल चंद्रकांत विठ्ठल सरतापे (वय ५९) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार नताशा एनक्लेव्ह येथे रविवारी रात्री साडेबारा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सरतापे यांना तीन मुले आहेत. रवि हा लहान आहे. तो एका कंपनीत कामाला आहे. त्यांच्यात नेहमीच घरगुती कारणावरुन भांडणे होत असतात. रविवारी रात्री उशिरा रवी घरी आला होता. तेव्हा घरात जेवण कमी पडले. त्यामुळे चिडलेल्या रवीने आपल्या आईला फरशी पुसायच्या मॉपने पाठीवर, तोंडावर तसेच गालावर काठीने फटके मारले. आईला सोडवायला मोठा मुलगा राज हा मध्ये पडल. तेव्हा त्यालाही शिवीगाळ करीत मारहाण करुन जखमी केले.

आरोग्य विषयक वृत्त – 

दुखण्याने त्रासलात ? मग, ‘हे’ खा, पेनकिलरला उत्तम पर्याय

ओठांवर आजाराचे ‘हे’ ६ संकेत दिसल्यास जा डॉक्टरांकडे ! 

कॅल्सिफिकेशन आजाराची ‘ही’ आहेत लक्षणे आणि त्यावरील उपाय 

‘हे’ सोपे उपाय अवलंबा आणि नैसर्गिक पद्धतीने हार्मोन्सचे नियंत्रण करा