“ईच्छा तिथे मार्ग” तरुणीची पोलीस उप निरीक्षक पदी निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पोलीस उप-निरीक्षक या पदाच्या निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालाने अनेकांची स्वप्ने पुर्ण करत त्यांच्या जिद्दीला ही समाजाने सलाम केला. अशाच एका सलामाला पात्र ठरणारी तरुणी काजोल नामदेव यादव.

काजोल ही मूळची सातारा या शहरातील रहिवाशी. अभ्यासात हुशार, संयमी व मनमिळाऊ. बालपणा पासून पोलिस अधिकारी होण्याची इच्छा. काजोलने कृषीविषयक पदवी प्राप्त करुन चार वर्षापुर्वी पोलीस उप-निरीक्षक या पदाकरीता तयारी सुरु केली. त्यासाठी तिने पुण्यात येऊन तिच्या मावशीकडे राहून अभ्यास सुरु केला. ती दोन वर्षापुर्वी उत्तीर्ण ही झाली. पण याच काळात तिचा छोटासा अपघात होऊन तिच्या पायाला प्लॅस्टर घालावे लागले. या अशा अचानक आलेल्या संकटाने तिला मैदानी परिक्षेस मुकावे लागले. पदरी निराशा आली. पण बालपणा पासूनच “इच्छा तिथे मार्ग” यावर विश्वास ठेवून जोमाने अभ्यास सुरु केला. तिचे स्वप्न चिकाटीने पुर्ण झाले. याचा अभिमान तिच्या कुटूंबिय, नातेवाईक व मित्रपरिवाराने आनंदाने साजरा केला. पीडीसीसी बँकेचे अधिक्षक आनंदा थोरात व मंडल अधिकारी असणाऱ्या पत्नी कुंदा थोरात यांनी काजोलचा सत्कार ही केला.

काजोल यादव यांनी त्यांचे यश म्हणजे एक बालपणीची स्वप्नपुर्ती असून जीवनात अशक्य काही नसते. फक्त मनापासून इच्छा असेल तर मार्ग ही तिथेच सापडतो असे सांगितले.