शहरात भटकी कुत्रे, डुक्करांचा प्रश्न गंभीर असल्याचे आयुक्तांनी केले मान्य

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरात भटकी कुत्री, डुक्करांचा प्रश्न गंभीर आहे. यांच्यावर पकडून कारवाई करताना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागते. तसेच यांना पकडण्यासाठी पाहिजे असणाऱ्या योग्य ठेकेदार मिळत नाहीत. त्यामुळे हा प्रश्न शहरवासियांना भेडसावत असून नागरिकांना त्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्य केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7416288c-bc98-11e8-976c-390b225e54de’]

बुधवारी महासभेत भटके कुत्री आणि डुक्कर याच्यावरून प्रचंड राडा झाला. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकामध्ये तू तू मै मै झाले. त्यामुळे यावर पत्रकारांशी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहराच्या विविध भागात भटकी कुत्री, डुक्करांचा उपद्रव वाढला आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत असून पालिका कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याचे काम करत आहे. वराह पालन करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. पालिकेकडून कुत्र्यांची नसबंदी केली जात आहे. गतवर्षी बारा हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्याला आहे त्याच ठिकाणी सोडण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे काही अडचणी येत आहेत.

कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी तीन संस्थाची नेमणूक केली आहे. त्यापैकी एका संस्थेच्या कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचे काम थांबविले असून नवीन संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. सध्या दोन संस्था कार्यरत आहेत. या संस्थांना अधिका चांगल्या रितीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. डुक्कर पकडण्यासाठी ठेकेदार मिळत नाही. त्या कामासाठी ठेकेदार नेमला जाणार असून पुढील महिन्यापर्यंत त्याची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. मोकाट जनावरे पांजरपोळमध्ये दिली जातात. तसेच मोकाट जणावरांसाठी चिखलीत जागेचे आरक्षण असून ते विकसित केले जाणार असल्याचेही, आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

होंडा सिटीच्या धडकेत आजी, नातवाचा मृत्यु

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी नगरसेवक, नागरिकांचे फोन उचलणे आवश्यक आहे. त्याबाबत तशा सूचना त्यांना दिल्या आहेत. फोन उचलत नसतील तर त्यांची चौकशी करुन कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, महापौर राहुल जाधव यांनी देखील डॉ.  डॉ. अरुण दगडे यांना फैलावर घेतले. नगरसेवक, नागरिकांच्या फोन उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आरोग्य आणि पशुवैद्यकीय विभागाची संयुक्त बैठक महापौर घेणार आहेत.

[amazon_link asins=’B07FF45SMT,B00K85W0TG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e03301b7-bc98-11e8-9b42-4b4f141b9f88′]

निगडीत भटके कुत्रे चावले

निगडी, यमुनानगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. भटक्या कुत्र्यांनी नऊ ते दहा जणांना चावा घेतला असून आज (बुधवारी) देखील एकाला चावा घेतला आहे. याबाबत ‘सारथी’ हेल्पलाईनवर तक्रार करुन देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप, स्थानिकांनी केला.

पिंपरी मतदार संघातील चार हजार ६४५ मतदारांची नावे वगळणार

यमुनानगर पोलीस चौकीच्या मागे देविदास लोखंडे नामक व्यक्तीला आज भटक्या कुत्र्याने चावा घेतला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या परिसरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. अडीच ते आठ वर्षांच्या नऊ ते दहा मुलांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ba41916b-bc98-11e8-b990-d3d3e5baa208′]