काय सांगता ! होय, फक्‍त एका शेळीमुळं कंपनीला लागला 2.68 कोटींचा ‘चुना’, सरकारी खजिन्यावर 46 लाखांचा ‘भार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडिशामध्ये काल झालेल्या एका अपघातात मृत्यू झालेल्या शेळीमुळे कंपनीला करोडो रुपयांचा चुना लागला. तसेच सरकारी खजिन्यावर देखील 46 लाख रुपयांचा भार पडला. मिळालेल्या माहितीनुसार, महानदी कोलफील्ड्स लिमिटेड कंपनीच्या कोळसा वाहणाऱ्या गाडीच्या धडकेत एका शेळीचा मृत्यू झाला.

यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी रास्तारोको केल्याने कंपनीचे 2.68 कोटी रुपयांचे नुकसान झाले. कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, या बकरीच्या मृत्यूंनंतर ग्रामस्थांनी 60 हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने कंपनीला काम थांबवावे लागले.

त्यानंतर यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. काम थांबल्यामुळे कंपनीला 2.68 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच यामुळे सरकारी खजिन्याचे देखील 46 लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, सोमवारी हि घटना घडल्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याने कंपनीला हे नुकसान सहन करावे लागले आहे.

Visit : Policenama.com