पुणे : कंपनीने कामगारांचा २ कोटींचा पीएफ थकवला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

फस्ट फ्लाईट कंपनीने कंपनीतील सहाशे कामगारांचा १ कोटी ८९ लाख १९ हजार ची भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्माचाऱ्यांच्या खात्यात न भरता रक्कमेचा अपहार केला. याप्रकरणी कंपनीच्या संचालकाविरुध्द स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जाहिरात

फस्ट फ्लाईट कुरिअर कंपनीचे गुलटेकडी मार्केट यार्ड येथे कार्यालय आहे. या कार्यालयात सहाशे कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांचे जुन २०१७ ते २०१८ या कलावधित मासिक पगारातून ७४ लाख ६८ हजार ८८० रुपये भविष्य निर्वाह निधीसाठी कपात केले होते. त्या निधीत कंपनीने १ कोटी १४ लाख ५० हजार ७३६ रुपये भरणे आवश्‍यक होते. मात्र या दोन्ही रकमा भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा न करता एकूण १ कोटी ८९ लाख १९ हजार रुपयांचा कंपनीने अपहार केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आर.एस.राठोड तपास करत आहेत

पोलिसात तक्रार केल्यामुळे मालकीनीकडे शरीर सुखाची मागणी