एमआयडीसीतील कंपनीत चोरी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी कंपनीत जॉब तयार करण्यासाठी ठेवलेले ८६ हजार ५०० रुपयांचे कॉपर आणि अ‍ॅल्युमिनियमचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी उघडकीस आली.

या प्रकरणी राहुल बाबुलाल शहा (३०, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली. तर अज्ञात तीन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ०३:३० ते ०५:०० वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन आरोपी तोंडाला रुमाल व मंकी कॅप बांधून आले. त्यांनी कंपनीच्या टॉयलेटवरून कंपनीच्या वरती चढून छताचा पत्रा उचकटला. त्यानंतर कंपनीत जॉब तयार करण्यासाठी ठेवलेले कॉपर आणि अ‍ॅल्युमिनियमचे ८६ हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरून नेले. तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.