The Confession : Nana Patekar | नाना पाटेकरांनी पुन्हा एकदा केलं मोठ्या पडद्यावर पुनरागमन, ‘द कन्फेशन’चा मोशन पोस्टर झाला प्रदर्शित (Video)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – The Confession : Nana Patekar | मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) गेल्या अनेक वर्षापासून इंडस्ट्री पासून लांब आहे. नानांचा चाहता वर्ग चांगलाच मोठा आहे. अखेर त्यांनी सुपरस्टार रजनीकांत (Superstar Ranjnikanth) यांच्या सोबत ‘काला (Kaala)’ या चित्रपटामध्ये काम केलं होत. लवकरच नाना मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणार आहे. त्यांचा ‘द कन्फेशन (The Confession : Nana Patekar)’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Powerful Motion Poster Of The Confession Came Out)

 

सोशल मीडियावरील ट्विटरवर एनालिस्ट तरण आदर्शनं (Taran Adarsh) नाना पाटेकरांच्या आगामी चित्रपट ‘द कन्फेशन (The Confession)’ चं मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे.
या पोस्टरमध्ये अभिनेता नाना पाटेकर यांचा आवाज ऐकू येत आहे.
मोशन पोस्टरच्या शेवटी ते कोर्टच्या रूममध्ये बसलेले दिसतात.

 

शेअर केलेल्या मोशन पोस्टर मध्ये नाना पाटेकर म्हणतात की, ‘सत्याचा चेहरा बघितला आहे मी, सत्याचा आवाज सुद्धा ऐकलाय मी, सत्य जाणून सुद्धा मला मान्य नाही, आणि जीव जरी गेला मान्य आहे मला.’
हा मोशन पोस्टर पाहून नानांचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत.

 

दरम्यान, नाना पाटेकरांचे चाहते फक्त देशात नव्हे, तर संपूर्ण जगभरात आहे.
तसेच त्यांच्या आगामी चित्रपट ‘द कन्फेशन’ चं मोशन पोस्टर (The Confession : Nana Patekar)
सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन (Ananth Narayan Mahadevan) यांनी केलं आहे.
परंतु अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही.
अनेक प्रेक्षक पुन्हा एकदा नाना पाटेकरांना पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

 

Web Title :- The Confession: Nana Patekar | nana patekar is making a comeback on the film screen the powerful motion poster of the confession came out

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा