अखेर काँग्रेसला अध्यक्ष मिळाला, ‘या’ नेत्याकडे अध्यक्ष पदाची जबाबदारी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर राजीनामा सत्र सुरु झाले होते. अनेक मोठ्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच आपला राजीनामा केंद्रीय समितीसमोर सादर केला होता.

त्यात आता अनेक राज्यात अंतर्गत कलह आणि गटबाजी समोर आल्यानंतर काँग्रेसच्या चिंतेत आणखीनच भर पडली होती. राहुल गांधी आपल्या पाच राजीनामा देण्यावर ठाम असल्याने अखेर काँग्रेसने तात्पुरता त्यांच्याऐवजी अध्यक्षपदासाठी एका जेष्ठ नेत्याचा विचार केला असून जोपर्यंत पक्षाला स्थिर अध्यक्ष मिळत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय समितीने या संदर्भात ए. के. अँटनी यांच्या नावाचा विचार केला असून या संदर्भात शेवटचा निर्णय सगळ्यांशी चर्चा करूनच घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ए. के. अँटनी हे जेष्ठ नेते असल्याने सर्वांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

सभागृह नेता होणार राहुल गांधी

पुढील आठवाड्यापासून सुरु होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात काँग्रेसच्या सभागृह नेत्याची निवड होणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर त्यांच्या सभागृह नेतेपदाची जबाबदारी देऊ शकतात. त्यामुळे जेष्ठ नेत्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे नाराज असलेले राहुल गांधी राजीनामा माहिती समोर येत होती.

त्यामुळे आता राहुल गांधी यांच्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांची अध्यक्षपदासाठी पुढे येत होती. मात्र आता शेवटी ए. के. अँटनी यांच्या नावर एकमत होण्याची शक्यता दिसत आहे. अँटनी मनमोहन सिंग सरकारच्या काळात सरंक्षण मंत्री होते.

Loading...
You might also like