सभागृहाचे कामकाज चांगले चालावे यासाठी काँग्रेस पक्षाकडून महापौरांना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाची घटना घडणे. हे योग्य नसून अशा घटना घडता कामा नये. यासाठी महापौरांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि महापालिकेच्या सभागृहाचे कामकाज चांगले चालावे. यासाठी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी महापौर मुक्ता टिळक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे या दोघांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोप झाले. आरोप प्रत्यारोपानंतर श्रीनाथ भिमाले नी 100 कोटीचा तर अरविंद शिंदे यांनी 25 कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या सर्व घडामोडी झाल्यानंतर आज पुणे महापालिकेत काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी नगरसेवक आणि पदाधिका-यां समावेत महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन दिले.

या निवेदनत महानगरपालिकेच्या सभागृहातील कामकाज चांगले चालावे अशी मागणी केली आहे. तसेच या सभागृहात अनेक दिग्गज नेत्यांनी काम केले असून मागील आठवड्यात झालेल्या सभागृहात एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप होता कामा नये आणि सभागृह चांगल्या प्रकारे चालले गेले पाहिजे. ही जबाबदारी महापौरांची असून अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये. तसेच सर्व साधारण सभेच्या दिवशी काही आधिका-यांच्या ऑफिसमध्ये काही व्यक्ती जाण्याच्या घटना घडत आहे. त्यांच्यावर दबाव आणून काम केले जात आहे. या सर्व प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.