महाराष्ट्रात ईद मिलादुन नबीवर वाद, उद्धव सरकारविरोधात कोर्टात जाणार रझा अ‍ॅकॅडमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम सण ईद मिलादुन नबी साजरा करण्याविषयी महाराष्ट्र सरकार आणि मुस्लिम संघटनांमध्ये वाद सुरू झाला आहे. मुसलमानांची धार्मिक संस्था रझा अ‍ॅकॅडमीने जाहीर केले आहे की उद्धव सरकारने त्यांना त्यांचा सण साजरा करण्यास परवानगी दिली नाही तर ते त्यांच्या मागणी आणि उद्धव सरकारच्या विरोधात कोर्टात धाव घेतील.

रझा अ‍ॅकॅडमीच्या म्हणण्यानुसार, हा उत्सव साजरा करण्यासाठी आणि मिरवणूकीला परवानगी देण्यासाठी रझा अ‍ॅकॅडमीने महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासनासमवेत बैठक घेतली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनीही मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचे आश्वासन दिले आहे पण अद्यापपर्यंत कोणताही निर्णय सरकार घेतलेला नाही. 30 ऑक्टोबरला ईद मिलादुन नबीचा सण आहे, मात्र महाराष्ट्र शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामळे या मुस्लिम संघटनेने आता कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

रझा अ‍ॅकॅडमीच्या म्हणण्यानुसार हा उत्सव सुमारे 102 वर्षांपासून मुंबईत साजरा केला जात आहे. ज्यामध्ये मिरवणूकही निघते, जी मुस्लिमांच्या श्रद्धेशी संबंधित आहे. दरम्यान मुंबईत बरेच काही उघडले गेले असताना महाराष्ट्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.

दरम्यान, कोरोनाच्या संकटाला ध्यानात घेऊन महाराष्ट्र सरकारने अद्याप कोणत्याही हिंदू सणांना गर्दीने साजरे करण्यास परवानगी दिली नाही, मंदिरेदेखील उघडण्याची सतत मागणी होत आहे, पण सरकारने कोणालाही कुठलाही उत्सव साजरा करण्याची परवानगी नाही, ज्यामुळे गर्दी वाढेल आणि त्याच वेळी कोरोनाचा धोकाही.