राष्ट्रवादी काँग्रेसचा पंतप्रधानांवर निशाणा, म्हणाले – ‘…या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडाला. अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता दिसून येत आहे. औषधं, ऑक्सिजन बेड्स आणि लसींच्या तुटवड्यामुळे अनेक स्तरांमधून केंद्र सरकारच्या ढीसाळ कारभारावर टीका होत आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी भारतातील कोरोना परिस्थिती हातळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या सरकारला अपयश आल्याची टीका केल्याचे पहायला मिळत आहे. अशाच प्रकारे जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमधील नेत्यांसंदर्भात घेण्यात आलेल्या एका ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. या जनमतचाचणीमध्ये 90 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत दिलं आहे. त्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झालेल्या देशांमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारे सर्वोच्च नेतृत्व म्हणून मोदींना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. या जनमतचाचणीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

‘द कॉन्व्हर्सेशन’ या वेबसाईटने ही जनमतचाचणी घेतली होती. काळात सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी घेण्यात आली. या चाचणीत मोदींचे नाणं खणखणीत वाजलं. सर्वात वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (75 हजार 450) 90 टक्के मतं मिळाली. काही दिवसांपूर्वी ‘द डेली गार्डियन’ या लोकल वृत्तपत्राला ग्लोबल भासवून मोदी कसे चांगले काम करतात, हे दाखवायचा प्रयत्न भाजपने केला. त्या तुलनेत ‘द कॉन्व्हर्सेशन’ हे वृत्तपत्र मोठं आहे. त्यामुळे दखल घेणे क्रमप्राप्त ठरेल. या चाचणीत अव्वल आलेल्यांना शुभेच्छा ! असं म्हणत कोरोना महामारी निंदनीय कामगिरी पंतप्रधान मोदी जगात भारी, असं टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानांवर डागलं आहे.

मोदींना किती मिळाली मतं ?

‘द कॉन्व्हर्सेशन’ने जनमत जणून घेण्यासाठी एक ट्विटर पोल घेतला. सर्वात वाईट कामगिरी कोणी केली ?, ट्विटरवर केवळ चार पर्याय देता येतात. त्यामुळे या चार पर्यायांपैकी इतर काही उत्तर असेल तर कमेंट करुन कळवा. असे म्हणत पोल पोस्ट करण्यात आला होता. या प्रश्नासाठी ब्राझीलचे बोल्सोनारो, भारताचे मोदी, मेक्सिकोचे अ‍ॅमलो आणि अमेरिकेचे ट्रम्प, असे चार पर्याय देण्यात आले होते.

या पोलमध्ये 75 हजार 450 जणांनी आपली मंत नोंदवली. त्यापैकी सर्वाधीक मतं म्हणजे 90 टक्के मंत ही मोदींना मिळाली. मोदींना 67 हजार 905 मतं मिळाली. मोदी हे जगामध्ये कोरोना परिस्थिती हाताळण्यात सर्वात वाईट कामगिरी करणारे नेते असल्याचे मत मांडलं आहे. त्यानंतर ट्रम्प यांना 5 टक्के मतं मिळाली, तर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना 3.7 टक्के तर मेक्सिकोच्या अ‍ॅमलो यांना 1.3 टक्के मतं मिळाली आहेत.