कोरोना व्हायरस ‘बहिरं’ देखील बनवतोय; ‘जिभ’ अन् ‘नाका’नंतर आता कानांवर देखील दुष्परिणाम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात थैमान घातलेली कोरोनाची (corona) दुसरी लाट हळूहळू नियंत्रणात येत आहे. मात्र अद्यापही कोरोना corona संपलेला नाही. दरम्यान कोरोना विषाणूची सर्वसाधारण लक्षण आता सगळ्यांनाच ठावूक झाली आहेत. ताप, थकवा, तोंडाची चव जाणं, वास न येण, खोकला ही कोरोनाची मूळ लक्षणं आहेत. मात्र, या लक्षणांमध्ये आता नव्या लक्षणांची भर पडली आहे. यात रुग्णांमध्ये बहिरेपणा, पोटासंबंधी गंभीर आजार, रक्ताच्या गुठळ्या होऊन गँगरीन होणे आदी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरल आहे.

दुसऱ्या लाटेत आढळणाऱ्या नव्या लक्षणांचा संबंध डॉक्टर देशातील डेल्टा वेरिएंटशी जोडत आहे. कोरोनाचा corona डेल्टा म्हणजे B.1.617.2 व्हेरिएंट गेल्या सहा वर्षांत 60 देशांत थैमान घातले आहे. इतर व्हेरिएंटच्या तुलनेत या व्हेरिएंटची संक्रमणाची तीव्रता, लशीचा प्रभाव कमी करणे अशा अनेक कारणामुळे या स्ट्रेनचा प्रभाव गंभीर होऊ शकतो. पोटात वेदना, उलटी, भूक कमी होणं, बहिरेपणा आदी लक्षणे नव्या रुग्णात दिसत आहेत. काही रुग्णांत मायक्रो थ्रोंबी अन् रक्ताच्या गुठळ्या दिसून येत आहेत. ज्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या आहे, त्यांच्यात इतर लक्षणे नाहीत. याला नवा व्हेरिएंट कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. काही रुग्णांच्या तर नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत असून ज्या आतड्यांमधील रक्तापर्यंत पोहचत आहेत. ज्यामुळे रुग्णाला पोटदुखी जाणवते. चेन्नईतील अपोलो रुग्णालययातील डॉ. अब्दुल गफूर यांनी यांनी म्हटले आहे की, B.1.617 चा नव्या लक्षणांशी काही संबंध आहे की नाही, हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याला अधिक अभ्यासाची गरज आहे. कोरोनाच्या corona पहिल्या लाटेच्या तुलनेत यावेळी डायरियाचे रुग्ण अधिक दिसून येत असल्याचे म्हटले आहे.

Also Read This : 

Coronavirus in Pune : पुण्यात 50 दिवसांमध्ये 53 हजार रूग्ण ‘कोरोना’मुक्त

COVID-19 Vaccination | देशभरात 21 जूनपासून मोफत दिली जाणार कोरोनाची लस, जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे

 

The corona virus also makes ‘deaf’; After ‘tongue’ and ‘nose’, now it also affects the ears