‘कोरोना योध्द्या’ लढाई जिंकून कर्तव्यावर हजर

थेऊर  : पोलीसनामा ऑनलाइन –   विरुद्ध लढ्यात आरोग्य खात्यातील प्रत्येकाचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे या लढाईत अनेक आरोग्य सेवकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे यापैकीच कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिव्यांग प्रयोगशाळा तज्ञ यांना कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण झाली पण त्यांनी मोठ्या हिमतीने लढा दिला आणि त्यावर मात करुन आज पुन्हा कर्तव्यावर हजर झाल्या.
कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तज्ञ कोरोना महामारीच्या काळात लोणी काळभोर येथील कोवीड सेंटर येथे स्वॅब कलेक्शनसाठी कर्तव्य पाडत, यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले त्या अपंग असूनही त्यांनी मोठ्या हिमतीने या आजारावर मात केली. गेली तीन आठवडे त्यांनी घरी राहून आज सोमवारी सकाळी पुन्हा कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर हजर झाल्या यावेळी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी त्याच्यासोबत सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

आपले अनुभव कथन करताना त्या प्रयोगशाळा तज्ञ म्हणाल्या, जेव्हा मी कोरोना पाॅजिटीव असल्याचे कळले त्यावेळी मी थोडं घाबरले कारण पूर्व हवेलीत तुरळक रुग्ण आढळून येत होते, यावेळी माझे वरिष्ठ सहकारी डाॅ. जाधव आणि डाॅ. लुकडे यांनी मोठे मानसिक बळ दिले.त्यानंतर माझ्या घरातील नातेवाईकाचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने खुपच बर वाटल.हाॅस्पिटलमध्ये असताना तेथे प्रत्येक जण आपापली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत होते वेळेवर औषधोपचार मिळाला आणि दहा दिवसानंतर मला घरी सोडण्यात आले. कोरोनाला घाबरुन जाऊ नका केवळ आपली काळजी घ्या घरात बसा शासन आपले कर्तव्य चोख पार पाडत आहे आम्ही आमचे काम करतोय आपणही आपली जबाबदारी ओळखा असे त्यांनी सुचविले