Coronavirus : चिंताजनक ! संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न येता ‘कोरोना’ व्हायरस देशात पसरतोय ?

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरस सध्या भारतातही वेगाने पसरत असून या व्हायरसची लागण जगभरात १६,०५,२७९ लोकांना झाली आहे. तर यापैकी ९५,७५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात देशात या व्हायरसचे ८०९ रुग्ण सापडले आहेत तर ४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील संक्रमितांचा आकडा ६,४१२ वर पोचली असून यातील १९९ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (आयसीएमआर) च्या अलीकडेच सादर झालेल्या अहवालातही संकेत दिसले असून सांगितले गेले आहे की, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न येताच कोरोनाचा प्रसार होत आहे. इतकेच नाही तर जे कधी परदेशात गेले नाही त्यांनाही संक्रमण होत आहे. आयसीएमआरसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यात अशा रूग्णांची संख्या ३८.४६ टक्के आहे.

पॉजिटीव्ह आढळलेले कधीच गेले नव्हते परदेशात

आयसीएमआरच्या टीमने १५ फेब्रुवारी ते २एप्रिल दरम्यान ५,९११ गंभीर तीव्र श्वसनाचा (एसएआरआय) आजार असणाऱ्या रुग्णांची तपासणी केली असताना ती पॉजिटीव्ह आली. त्यात २० राज्य आणि ५२ केंद्र प्रदेशातील १०४ एसएआरआयचे रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह आढळले आहेत. आयसीएमआर अहवालात असे म्हटले आहे की, या १०४ मधील ४० जण कोरोना संक्रमित व्यक्तीच्या कधीही संपर्कात आले नव्हते. तर देशातील १५ राज्यांमधील ३६ जिल्ह्यांमध्ये आढळलेले पॉजिटीव्ह रुग्ण कधीच परदेशातही गेले नव्हते. आयसीएमआरने एसएआरआय रुग्णांच्या सेंटिनल सर्व्हिलन्सच्या आधारे हा संसर्ग किती आणि कुठपर्यंत पसरला आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आयसीएमआरने सुरू केले होते सेंटिनल सर्व्हिलन्स

१९ मार्च रोजी आयसीएमआरने सांगितले की, कोरोना विषाणूचे समुदाय प्रसारण करण्यासाठी कौन्सिलने सेंटिनल पाळत ठेवणे सुरू केले असून कौन्सिलने समुदाय प्रसारणाबाबत अहवालात काही सांगितलेले नाही. मागच्या २४ तासात नवीन प्रकरणे आणि पॉजिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कात न येता संक्रमण झालेल्यांच्या आधारावर देशात समुदाय संक्रमण होण्याची भीती आहे, असे म्हणता येईल. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, पुरुषांमध्ये आणि ५० पेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये एसएआरआय रुग्णांमध्ये कोरोनाचे संक्रमण आढळण्याची शक्यता अधिक आहे. तसेच त्यांची टीम कम्युनिटी ट्रांसमिशन आधारे देशाकडे बारीक लक्ष ठेवून असल्याचे कौन्सिलने म्हटले.

संक्रमण थांबवण्यासाठी खास जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक

सेंटिनल सर्व्हिलन्सच्या आधारे जिथे एसएआरआय रुग्ण आढळले त्या जिल्ह्यात संक्रमण रोखण्यासाठी लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे आयसीएमआरने म्हटले. एसएआरआय रूग्णांमध्ये कोरोनाचा प्रसार होण्यासाठी सेंटिनल सर्व्हिलन्स वाढवून संक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.