नगरसेविकेची वाहतूक पोलीसाला आरेरावी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करुन विरुद्ध दिशेने येणाऱ्या नगरसेविकेच्या गाडीला वाहतूक पोलिसांनी आडवले. गाडी आडवल्याच्या कारणावरुन संतापलेल्या नगरसेविकेने वाहतुक पोलिसांबरोबर हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. नगरसेविकेने वहतूक पोलिसाबरोबर केलेल्या हुज्जतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुल तोडण्याचे काम सुरु असल्याने गणेश कॉलनी, पिंप्राळा रेल्वे गेट व दूध फेडरेशन रेल्वे गेट या मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.

त्यामुळे या तिन्ही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुक सुरळीत व कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांची ड्युटी लावण्यात आली आहे. बुधवारी दूध फेडरेशनच्या गेटजवळ वाहतूक शाखेचे भाऊराव घेटे यांची ड्युटी होती. वाहनांची गर्दी असल्याने घेटे शिस्त लावण्याचे काम करीत होते. त्याचवेळी एक नगरसेविका दुचाकीवरुन विरुध्द दिशेने आल्या. घेटे यांनी त्यांना थांबविले व तुमच्यामुळे सर्वच वाहनधारक विरुध्द दिशेने येतील व पुन्हा वाहतूक कोंडी होईल असे सांगितले असता नगरसेविका भडकल्या.

पोलिसाने नियमाची जाणीव करुन देताच नगरसेविकेचा संताप झाला. तुम्ही मला ओळखत नाही का?..मला नियम सांगायचे नाही…तुम्ही तुमचे काम करा..अशा शब्दात लोकांच्या समोर खडे बोल सुनावले. चूक असतानाही वाहतूक पोलिसाला दोन शब्द सुनावले जात असल्याचा हा प्रकार अनेकांना खटकला. काही जणांनी त्याचा व्हिडीओ तयार केला आणि लगेच सोशल मीडियावर व्हायरलही केला. पोलिसाने महिला असल्याने नमते घेण्याची भूमिका घेतली. वरिष्ठ अधिकारी या घटनेची दखल घेऊन त्या नगरसेविकेवर गुन्हा दाखल करणार का असा सवाल विचारला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव ? व्हायरल मेसेजने खळबळ

धुळे : LCB ची कारवाई ; अफूची शेती करणारे 2 शेतकरी ताब्यात

पीएमपी घेणार ४० बसेस भाड्याने..

बायकोच बोलणं ऐकायला लागू नये म्हणून केलं बहिरेपणाचं नाटक , ६२ वर्षांनतर पत्नी कोर्टात …

कार्तिक-साराचा किसिंगचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल