22 वर्षाच्या मुलीला 6 वर्षाची समजून घेतलं ‘दत्‍तक’, पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2009 मध्ये आलेल्या ‘ऑफर्न’ चित्रपटाप्रमाणे एक घटना घडली आहे. या चित्रपटात एका जोडप्याने एक लहान मुलगी दत्तक घेतलेली असते मात्र नंतर त्यांना समजते की ही मुलगी लहान नसून पूर्णपणे मोठी आहे. नुकताच असा एक प्रकार समोर आला आहे. एका कपलने लहान मुलगी समजून दत्तक घेतलेलं मूल खरतर मोठी मुलगी निघाली.

क्रिस्टीन बॉर्नेट आणि पती माइकल बॉर्नेट ने 2010 मध्ये एका मुलीला दत्तक घेतले होते. त्यांना त्यावेळी सांगण्यात आपले होते की ही मुलगी सहा वर्षांची आहे मात्र नंतर त्यांना समजले की तिचे वय २२ वर्षांचे आहे. त्यानंतर त्यांनी त्या नतालीया नामक तरुणीला घराबाहेर काढले. त्यानंतर या सर्व प्रकारचा खुलासा व्हायला सुरुवात झाली. या दाम्पत्याविरोधात जेव्हा अरेस्ट वॉरंट निघले त्यावेळी यांनी आत्मसमर्पण केले.

जेव्हा पोलिसांनी याबाबत त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी अनेक खुलासे केले त्यांनी सांगितले की,नतालियाची उंची छोटी आहे मात्र ती वयाने खूप मोठी आहे. आणि जेव्हा तिला दत्तक घेण्यात आले होते तेव्हा त्यांना सांगण्यात आले होते की ही अजून चालूही शकत नाही मात्र बार्नेट यांनी नतालीयाला बीच वर फिरताना पाहिले.

क्रिस्टीन बॉर्नेट यांनी सांगितले की मोठा झटका तर त्यांना तेव्हा लागला जेव्हा त्यांनी मुलीला अंघोळ घालताना पहिले की त्या लहान मुलीच्या गुप्तांगावर केस आलेले आहेत आणि तिला मोठ्या महिलांप्रमाणे मासिक पाळी सुद्धा सुरु आहे. तसेच क्रिस्टिनने नतालियाने आपल्या पतीला मारण्याचा प्रयत्न केला असल्याचेही सांगितले.

तसेच नतालियाने त्यांच्या इतर मुलांना देखील मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे क्रिस्टीनने सांगिलते. त्यानंतर त्यांनी नतालियाला डॉक्टरलाही दाखवले तेव्हा हि गोष्ट समोर आली की नतालिया लहान मुलगी नाही. सध्या क्रिस्टीन आणि मायकलला जामिनावर सोडण्यात आले आहे. Tippecanoe काउंटी शेरिफ विभागाने त्यांच्यावर आरोप केले आहेत की ते एका लहान मुलीला घरात कोंडून विदेशात फिरायला गेले होते. मात्र नतालिया चा जन्म 1989 मध्ये झाला असल्याचा पाठपुरावा न्यायालयाने केला आहे.